महागाईविरोधातील मोर्चाआडून शिवसेनेचा भाजपवर निशाना

UDDAV-THEKETRey

वेब टीम;सत्तेत सहभागी असणारी शिवसेना आता भाजपला महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्याच्या तयारीत असून उद्या बोरिवलीत मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे .मित्रपक्ष भाजपच्या माथ्यावर महागाईचे खापर फोडण्यासाठी आंदोलनाचा वणवा राज्यभर पोहचवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे.

शिवसेना आणि भाजपमधील सत्ता संघर्ष टोकाला पोहचला असून दोन्ही पक्ष एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत . सध्या राज्यातील तसेच देशातील जनता महागाईमुळे मोठ्या प्रमाणावर हैराण असल्याचे चित्र आहे . भाजपविरोधात जनतेमध्ये वाढत असलेल्या नाराजीला खतपाणी घालण्याचे काम शिवसेना वेळोवेळी करत आली आहे . महागाईच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यासाठी शिवसेना आता राज्यभर आंदोलन करणार आहे ज्याची सुरुवात उद्या बोरीवली मधून होणार आहे. त्यानंतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा मानस आहे . शिवसेनेच्या आंदोलनाला सामान्य जनता किती प्रतिसाद देते हे लवकरच स्पष्ट होईल.