fbpx

तीन दिवसात दोषींना पकडा अन्यथा रस्त्यांवर उतरणार : शिवसेना

savarakar statue

टीम महाराष्ट्र देशा- पुतळ्यांची विटंबना करण्याचे निंदनीय प्रकार सुरूच असून औरंगाबादमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. आज सकाळी समर्थनगर भागात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणानंतरहिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून शिवसेनेने दोषींना पकडण्यासाठी पोलिसांना तीन अल्टिमेटम दिला असून जर दोषींना पकडण्यात आले नाही तर तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना विधानसभा संघटक नगरसेवक राजू वैद्य यांनी दिला आहे.

आज सकाळी समर्थनगर भागात असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.. ही बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर शिवसैनिक,हिंदुत्ववादी आणि सावरकरप्रेमी जनता संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरली होती.  पुतळ्याची विटंबना झाल्याचं कळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल,विधानसभा संघटक राजू वैद्य, नगरसेवक सचिन खैरे,माजी नगरसेवक गोपाळ कुलकर्णी, भाजपचे आमदार अतुल सावे, विहींपचे शैलेश पत्की, हिंदुत्ववादी संघटना आदींनी तातडीन समर्थनगर भागाकडे धाव घेतली. तीन दिवसांच्या आत आरोपीला अटक करा अन्यथा शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसांची जबाबदारी असेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

नेमकं काय म्हटलं आहे शिवसेनेने ?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर शाई फेकण्यात आली . ही घटना गंभीर आसुन अशा घटनांचा निषेध झाला पहिजे. या घटनेचा निषेध करत समर्थनगर येथे आम्ही रस्ता रोको आंदोलन केले परंतु पोलिस प्रशासनाने रस्ता रोको करू नका आम्ही कारवाई करू अशी विनंती केली .विनंती मान्य करून आम्ही आंदोलन थांबवलं . प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करावी व तीन दिवसात दोषीना अटक करावी अन्यथा तीव्र अंदोलन करण्यात येईल .यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील .
– राजू वैद्य विधानसभा संघटक , नगरसेवक शिवसेना

सीसीटीव्हीच्या मदतीने करणार पुढील कारवाई : श्रीपाद परोपकारी ,पोलिस निरक्षक , क्रांती चौक पोलीस स्टेशन

सावरकर पुतळ्याची जी वीटंबना झाली ती अज्ञात इसमाने केली असुन त्यावर गुन्हा दाखल झाला आहे .व सावरकर चौकातील सिसीटीव्ही फुटेज ची मदत घेऊन पुढील तपास चालू आहे . लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल

2 Comments

Click here to post a comment