विद्यार्थी नेत्यावर हल्ल्याचा आरोप असणाऱ्या ‘या’ तरुणाला शिवसेनेनी दिली उमेदवारी

Shivsena

टीम महाराष्ट्र देशा:- नवीन दलाल याला हरियाणा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकीट दिले आहे .शिवसेनेनं दलालला हरियाणातील बहादूरगड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. दरम्यान नवीन दलाल याच्यावर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद हल्ला करण्याचा आरोप आहे.

नवीन याने सांगितले आहे की, सहा महिन्यांपूर्वीच मी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. कारण भाजप आणि काँग्रेससारखे पक्ष गाय, शेतकरी, शहीद आणि गरिबांच्या नावे राजकारण करत आहेत.त्यामुळे शिवसेनेच्या नीती आणि अन्य मुद्द्यांवर घेतलेल्या स्पष्ट भूमिकेमुळे पक्षात मी सहभागी झालो आहे.

तसेच गेल्या 10 वर्षांपासून मी गोरक्षेसारख्या मुद्द्यावर लढत आहे. मला असं वाटतं, भाजपा आणि काँग्रेससारखे पक्ष फक्त गाय आणि शेतकऱ्यांच्या नावे राजकारण करतात. मला माझ्या विधानसभा क्षेत्रात खूप समर्थन मिळत आहे. त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी प्रेरित केलं. जेणेकरून मी त्यांचे प्रश्न उपस्थित करून त्यांना न्याय देऊ शकेन असे ही नवीन म्हणाला .

दरम्यान, शिवसेनेचे दक्षिण हरियाणाचे अध्यक्ष विक्रम यादव यांनी देखील दलालच्या उमेदवारीला दुजोरा दिला आहे. तसेच गोरक्षा आणि देशविरोधी घोषणा देण्यांविरोधात भूमिका घेतल्यानेच दलालला उमेदवारी दिल्याची माहिती यादव यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या