हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली – प्रसाद लाड

prasad lad

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याच्या जडणघडणीचा इतिहास अभ्यासायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाकडे कानाडोळा करुन चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन एक संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या शिवसेनेने नंतर संपूर्ण राज्यामध्ये कसं प्रस्थ निर्माण केलं हे बहुतांश जणांना ज्ञात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे कडवे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक खास ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘साहेब…तुमच्या सारखे तुम्हीच!’ असे म्हणत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दादर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसैनिक व नेत्यांची रीघ लागली आहे. यावेळी संजय राऊत यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे.

भाजपचे नेते प्रसाद लाड यांनीही बाळासाहेबांना वंदन केलं आहे.त्यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्व हे बाळासाहेबांचंच पण शिवसेना हे हिंदुत्व आता विसरली आहे. संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीकडे जाऊन स्वत:ची तत्व विकली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी भाजपला हिंदुत्व शिकवू नये, असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे. जनसंघाच्या सर्वच नेत्यांचं स्थान आमच्या हृदयात आहे. आम्ही कुणाला विसरलो नाही. अटलजी, अडवाणीजी आमचे आदर्श आहेत आणि राहतील असंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या