शिवसेना जनतेला मूर्ख बनवायचे काम करते – जितेंद्र आव्हाड

वेब टीम – अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे. कायदा पारित होताना सेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. कायद्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय होतो, तो अंमलात येतो त्यानंतर उद्धव ठाकरे वेगळा निर्णय घेतात असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

सेनेचे मंत्री व उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय नाही किंवा कायदा पारित करून घ्यायचा व जनतेला मूर्ख बनवायचे, हे काम शिवसेनेच्या माध्यमातून सुरु आहे. शिवसेनेने हे नाटक करण्यापेक्षा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेऊन सरकारमधून बाहेर पडावे आणि अंगणवाडी सेविकांना आश्वस्त करावे असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेची दुटप्पी भूमिका यातही दिसून येते. बिल आणत असताना, निर्णय घेत असताना शिवसेना गप्प बसते. कॅबिनेटमध्ये तोंड उघडत नाही अशी टीका अजित पवार यांनी सभागृहात केली.