साहेब ! युती तोडू नका ; शिवसेना खासदारांचे उद्धव ठाकरेंना साकडे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केल्यापासून पक्षात दोन गट पडले आहेत. त्यातच आता लोकसभेतील एका खासदाराने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले की, 2014 साली भाजपाशी युती केल्यामुळे शिवसेनेने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी देशभरात मोदी लाट होती. यावेळी भले मोदी लाटेचा तितकासा प्रभाव नसल्यामुळे काही प्रमाणात नुकसान होईल.

मात्र, हे नुकसान सीमित ठेवायचे असेल तर शिवसेनेला भाजपासोबत युती करण्याशिवाय गत्यंतर नाही. युती न केल्यास शिवसेनेला लोकसभेच्या अवघ्या पाच ते सहाच जागा जिंकता येतील. ही बाब आम्ही उद्धवजींच्या लक्षात आणून दिली असल्याचे या खासदाराने सांगितले आहे.

दरम्यान, एकीकडे संजय राऊत यांच्यासारखे नेते भाजपाविरुद्ध आक्रमक भाषा करत असताना अनेक खासदार उद्धव ठाकरे यांना आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.