fbpx

शिवसेनेने भाजपचे सत्ता सूत्र फेटाळले

टीम महाराष्ट्र देशा – मागील चार वर्षापासून दोन्ही पक्षात सुरु असणारी तूतु मै मै थांबवत, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. युती संदर्भात शहा आणि ठाकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली.

यांनतर भाजपचे सत्ता सूत्र शिवसेनेने फेटाळले आहे. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे जबाबदारीचं समसमान वाटप आपण मान्य केल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

मागील 25 वर्ष आपण जे करत होतो, ते यावेळी आपण स्वीकारलेलं नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. आपण तहात जिंकलो आहे आता युद्धातही जिंकायचंय. मी जे करेन ते शिवसैनिकांच्या हिताचेच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.