पालघरमध्ये फेरमतदान घेण्याची शिवसेनेची मागणी

shivsena flag

पालघर : पालघरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलंय. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. तर श्रीनिवास वनगा यांना २,४०,६१९ मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,१६,९५३ मतं मिळाली. गावित 44589 मतांनी विजयी झाले.

Loading...

दरम्यान आता शिवसेनेनं पालघर निवडणुकीच्या निकालावर हरकत घेतलीये. निवडणूक आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचं कारण देत, शिवसेनेनं पालघरमध्ये फेरमतदान घ्यावं अशी मागणी केली आहे. तशी मागणी करणारं पत्र शिवसेनेनं निवडणूक आयोगाला दिलं आहे. दरम्यान आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.Loading…


Loading…

Loading...