कमळ नाही तर सर्वत्र फक्त मळ दिसतोय; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

कमळ नाही तर सर्वत्र फक्त मळ दिसतोय म्हणत आज दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेकडे लक्ष वेधत मुंबई आणि उपनगरांतील गर्दीच्या स्थानकांमधील सर्वच जिने आणि पूल रुंद करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. आम्ही सत्तेत असून विरोधाची भूमिका घेतो अशी टीका केली जाते. मात्र, आम्ही सत्तेतही आणि विरोधातही आहोत ते केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारमधील सहभागाची पाठराखण देखील केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
शिवसेना संपवण्याची स्वप्न बघतायेत तुम्ही, पण अनेकजण आले आणि गेले !

साथ द्यायची उघडपणे आणि लाथ घालायची तीपण उघडपणे, मग आमचं काय चुकलं ?

चने देणार पण दात पाडणार? हा कोणता कारभार ?

आता त्याचा उलटा वापर होतोय. त्या तरुणांना तुम्ही नोटीस पाठवता.ते पेटून उठले तर जबाबदार कोण?

शेंडी, जानवंवालं हिंदुत्व सेनेला मान्य नाही !

शेतकऱ्यांची कर्जमाफी शिवसेनेने सरकारच्या डोक्यावर बसून करून घेतली !

पवार साहेब जे करतो ते थेटपणे उघड करतो. तुमच्या सारख अदृश्य हात नाहीत आमचे..! तुमच्या राजकारणासाठी हिंदुत्व फोडू नका.

ज्यावेळी तुम्ही हिंदुत्व फोडाल त्यावेळी तुमचं नशीब ही फुटेल

मोफत वीज देण्यासाठी सौभाग्य योजना सुरू केली, मग ग्रामीण भागात वीज बिल भरण्याची जाहिरात कशाला ?

त्रास देण्याशिवाय मोदी सरकारने सर्वसामान्यांना काय दिलं?

विकासदर घसरला, 15 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या याला जबाबदार कोण?

जीएसटीवेळी सेनेने भूमिका लावून धरली नसती, तर महापालिकांचं महसूल बुडालं असतं !

जेएनयू विद्यापीठात बोलणारे देशद्रोही, मग मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी काय घोडं मारलं ? का निकाल लागले नाही ?

बुलेट ट्रेनच्या नावाने आमच्या खांद्यावर मोदींचं ओझं नका टाकू

संपूर्ण देशात कारभाराचं चिखल झालयं !