fbpx

येऊ दया अंगावर, होऊ दया सामना, शिवसेनेचं भाजपला आव्हान

टीम महाराष्ट्र देशा : ‘वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे’, असं वक्तव्य काल भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केल्याने युतीतील तणाव आणखी वाढला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांच्या युतीच्या वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय.

शहा यांचं वक्तव्य हे मस्तवाल आणि उन्मत्त आहे. अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेण्यास शिवसेना नेहमीच तयार असते. येऊ दया अंगावर, होऊ दया सामना अशी प्रतिक्रिया शिवसेनेने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केलीय.