चंद्रकांत दादांचेही गंडो गयो छे; सामनातून चंद्रकांत पाटलांवर निशाना

सध्या रस्त्यावर असो कि सामनामधून रोज शिवसेनेकडून भाजपला टार्गेट केल जात आहे. त्यातच शिवसेनेने सरकारविरोधात आंदोलन करून स्वतःचेच हसे करून घेतल्याच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होत. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधला आहे.

‘चंद्रकांत पाटील तसे बरे गृहस्थ आहेत, त्यांचे भाजप अध्यक्ष अमित शाहांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळेच त्यांना महसूलमंत्रीपद मिळालं. शिवाय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतही त्यांचं नाव चर्चेत असतं. मात्र मुख्यमंत्रीपदाची आशा बाळगणाऱ्या एकनाथ खडसेंचं काय झालं हे विसरु नका, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील प्रमुख मुद्दे
सत्तेच्या नशेने त्यांचा ‘इक्बाल कासकर’ झाला आहे. कासकर हा ‘नशे’च्या फेऱयात सापडल्याने त्याला मागचे पुढचे काहीच आठवत नाही व तो असंबद्ध असे काहीतरी बडबडत असल्याचे पोलीस तपासात दिसत आहे. सत्तेच्या जहाल ‘खोपडी’ दारूने

शिवसेना फसवाफसवी करून सत्ता भोगीत नाही. शिवसेनेने सत्तेत राहून आंदोलने वगैरे करू नयेत असे चंद्रकांत पाटलांना वाटत असेल तर त्यांच्या सरकारने गोरगरीबांचे प्रश्न सोडवायला हवेत. आम्ही काल अंगणवाडी सेविकांच्या मोर्चात स्वतःहून सामील झालो. कुपोषित बालकांच्या सेवा करणाऱया या माता-भगिनींचे प्रश्न तुम्ही राज्यकर्ते म्हणून खुंटीलाच टांगून ठेवणार असाल तर आम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही.

ऑनलाइन अर्ज भरणे वगैरे ठीक असले तरी कर्जमाफीसाठी सरकारी अटींची पूर्तता करता करता कर्जबाजारी शेतकऱयांचे नाकीनऊ आले आहे. किंबहुना कर्जमाफी नको, या ‘अटी व शर्ती आवरा’ अशी सध्या बळीराजाची अवस्था झाली आहे.