मीरा भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा भाजपचा घाट

टीम महाराष्ट्र देशा  – मीरा भाईंदर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशीमीरा नाका येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हटवण्याचा घाट सत्ताधारी भाजपाने घातल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज शिवजयंतीच्या दिवशी आयुक्तांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेने अश्या कुठल्याही प्रकाराला कडाडून विरोध केला आहे.

महाराजांचा पुतळा हटवण्याचे मनसुबे कोणत्याही स्थितीत शिवसेना हाणून पाडेल असा इशारा देतानाच सदर पुतळयाच्या चौथऱ्याची उंची वाढवून परिसर सुशोभित करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

Loading...

नवनियुक्त आयुक्तांचे स्वागत करुन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.महाराजांचा काशिमीरा येथील अश्वारूढ पुतळा मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर येथे हलवण्यात येण्याचा विचार व हालचाली सत्ताधारी भाजपा करत असल्याचे बोलले जातेय. मात्र महाराजांचा काशीमीरा येथील पुतळा कुठल्याही परिस्थितीत तेथून स्थलांतरित करण्याचा विचार कुणीही करू नये. असा विचार सुद्धा केला तर त्याला शिवसेनेच्या रुद्रावताराला सामोरे जावे लागेल असा इशारा सरनाईक यांनी दिला.

काशिमीरा नाका येथून शहरात मेट्रो येणार आहे. मेट्रो व उन्नत मार्गाचे काम सुरु आहे. याठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथेच कायम ठेवावा व महाराजांच्या पुतळ्याची उंची किमान २५ फुटांनी वाढवावी. पुतळ्याची उंची वाढवून त्याचे सुशोभिकरण करावे. शहरातून कुठूनही हा पुतळा दिसला पाहिजे. घोडबंदर किल्ला सुशोभीकरण करत असताना किल्ल्यात महाराजांचा नवीन पुतळा बसवावा असे सरनाईक यांनी सांगीतले.

आयुक्त चंद्रकांत डांगे यांची आज आ. सरनाईक सह विरोध पक्षनेता प्रविण पाटील, सभापती तारा घरत, गटनेता हरिश्चंद्र आमगावकर, नगरसेविका निलम ढवण, राजु भोईर, स्नेहा पांडे, संध्या पाटील, वंदना पाटील ,कुसूम गुप्ता ,दिनेश नलावडे, अर्चना कदम , कमलेश भोईर , दिप्ती भट, भावना भोईर, शर्मिला बगाजी, हेलन गोविंद तसेच पदाधिकारी प्रभाकर म्हात्रे, स्नेहल सावंत, विक्र म प्रतापिसंग , शुभांगी कोटीयन, पप्पु भिसे, श्रेया साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका