पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला, सरकारने हा तमाशा विसरू नये

udhav thakre

टीम महाराष्ट्र देशा : पाकिस्तानातील भारतीय दुतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी धमकावल्याची घटना समोर आली आहे, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल भारताकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’च्या अग्रलेखात, पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे. इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य असल्याचे म्हंटले आहे.

Loading...

इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले. निमंत्रित पाहुण्यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अनेकांना धमकावून परत पाठवले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत आहे. त्या शेपटाचाही बंदोबस्त आता करावा लागेल, असा रोष सामनामधून व्यक्त करण्यात आला आहे.

सामना अग्रेलाखातील प्रमुख मुद्दे

पुलवामा हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने घेतला. पाकडय़ांच्या घरात घुसून अतिरेकी मारले, त्यांचे तळ उद्ध्वस्त केले. तेव्हापासून पाकिस्तान तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत होते. त्यात हिंदुस्थानच्या राजनैतिक यंत्रणेने जोर लावून मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. हे फुटके थोबाड घेऊन पाकडय़ांना जगासमोर येणे कठीणच झाले होते. त्यात मोदी सरकार पुन्हा भरघोस बहुमताने सत्तेवर आले. या धक्क्यातून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान सावरणे कठीण आहे.

इम्रान यांनी मोदी यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच दोन देशांनी मिळून विकास आणि शांततेवर काम करावे अशी भावनाही म्हणे त्यांनी व्यक्त केली. मात्र प्रत्यक्षात शनिवारी इस्लामाबादेतील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे काय? पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे. पाकिस्तान कोणतीही चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही.

पठाणकोट हल्ला, उरीचा हल्ला व पुलवामा हल्ल्याचे धागेदोरे पाकमध्ये पोसलेल्या दहशतवाद्यांकडे असल्याचे पुरावे देऊनही नवाज शरीफ ते इम्रान खान यांच्यापैकी कोणीच ठोस कारवाई केली नाही. तिथे शेपूट घालायचे व इथे स्वतःच्या गल्लीत मरतुकडय़ा कुत्र्यासारखे भुंकायचे. पठाणकोट हल्ल्यानंतर दोन देशांतील सर्व चर्चा आणि व्यवहार बंद आहेत, व्यापार बंद आहे. खेळ व सांस्कृतिक संबंध तुटले आहेत. पाकिस्तानच्या बाबतीत चीनही आज कुंपणावर आहे हे अजहर मसूद प्रकरणात दिसून आले.







Loading…










Loading…

Loading...