fbpx

सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक झालं मग शिवस्मारक का नाही ?

टीम महारष्ट्र देशा : शिवस्मारक होणार आहे कि नाही याबाबत सर्वत्र आता संभ्रमी चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आता शिवसेनेने देखील भाजप सरकारला धारेवर धरले असल्याच चित्र दिसत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यासाठी कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. मात्र, शिवस्मारकाच्या उभारणीसाठी का अडचणी येत आहेत असा सवाल शिवसेनेने सामनातून  केला आहे.

सध्या भाजप नेते बलवान झाले असून जे आडवे येतील त्याला पटकून टाकू अशी भाष्य करत आहेत पण शिवस्मारकासं आडवे येणाऱ्याना भाजप का पटकून टाकत नाही असा खरपूस समाचार शिवसेनेकडून घेण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाद्वारे शिवस्मारकाच्या कामात अडथळे तर कोणी आणत नाहीना अशी शंका देखील शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत या संदर्भातच शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शिवाय, सुप्रीम कोर्टात राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी काय पावलं उचलावीत, याबाबतही चर्चा झाली होती. पण आता पर्यंत शिवस्मारकावर चर्चाच होत आहेत पण प्रत्यक्षात शिवस्मारक केव्हा उभे राहणार हे मात्र अद्याप सांगता येणार नाही.