पंतप्रधानांपासूनच प्रेरणा घेऊन भाजपचे पुढारी तोंडास येईल ते बोलतात – शिवसेना

udhav thackeray and samna

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत. संतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच. अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून करण्यात आले आहे.

Loading...

काय आहे आजचे सामना संपादकीय ?

माध्यमांना मसाला देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, पण २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते. भाजपचे अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत. संतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच.

‘तोंड आवरा’ असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी स्वपक्षाच्याच आमदार-खासदारांना दिला आहे. तोंडास लगाम घालण्याच्या सूचना याआधीही श्री. मोदी यांनी भाजपच्या आमदार-खासदारांना दिल्या होत्या. संसदीय पक्षाच्या बैठकीतही त्यांनी अनेकदा अनेकांची कानउघाडणी केली आहे, पण त्या ‘मोदी’ मंत्राचा उपयोग झाला नाही व अनेक जण तोंडास येईल ते बोलत राहिले. मोदी मंत्रिमंडळातील एक मंत्री संतोष गंगवार यांनी आता ‘बलात्कार’ प्रकरणात जे महनीय विचार मांडले आहेत ते धक्कादायक आहेत. ‘‘इतक्या मोठ्य़ा देशात एक-दोन बलात्काराच्या घटना घडणारच. प्रसिद्धी माध्यमांनी त्याचा इतका बाऊ का करावा?’’ असा भाबडा प्रश्न श्रीमान गंगवार यांनी विचारला आहे. सध्या देशभरात ‘बलात्कार’ व महिलांवरील अत्याचार वाढल्याचे वातावरण आहे. चिमुरड्य़ांवर नराधम अत्याचार करतात व त्यानंतर हत्या करून मृतदेह फेकले जातात, पण इतक्या मोठ्य़ा देशात हे असे घडायचेच असे सांगणारे राज्यकर्ते दिल्लीत विराजमान आहेत. २६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी राज्याचे त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीही अशीच जीभ घसरली होती. ‘‘इतने बडे शहर में ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है’’ या त्यांच्या विधानावर एकच काहूर माजले व भारतीय जनता पक्षाने तर पाटलांना पळता भुई थोडी केली.

शेवटी पाटील यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संतोष गंगवारांचा गुन्हा त्यापेक्षादेखील गंभीर आहे. तरीही ते मंत्रीपदावर चिकटून आहेत व महिलांचा हा असा अपमान केल्याबद्दल त्यांचा राजीनामा कोणी मागितलेला नाही. फक्त ‘तोंड आवरा’ इतकाच महत्त्वाचा सल्ला मिळाला आहे. माध्यमांना मसाला देऊ नका असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, पण २०१४ पर्यंत माध्यमांना लोणची, मसाले व पापड पुरवूनच ‘भाजप’ने स्वतःची खिचडी पकवली. त्यामुळे मसाल्याची बात भाजपने करावी याची गंमत वाटते. भाजपचे राज्यातील अनेक पुढारी व मंत्रीदेखील तोंडास येईल ते बोलत असतात, पण त्यांनी ही प्रेरणा आमच्या पंतप्रधानांपासूनच घेतली असावी. अटलबिहारी वाजपेयी हेसुद्धा देशाचे पंतप्रधान होते, पण ते मोजके व नेटके बोलत. स्वतः पंतप्रधानांनी कमीत कमी बोलावे असे संकेत आहेत, पण मोदी ऊठसूट कोणत्याही विषयावर बोलत असतात, असे त्यांचे विरोधक म्हणतात. कालपर्यंत प्रसारमाध्यमांना मसाला पुरवण्याचे काम मोदी करीतच होते, मात्र आता प्रसारमाध्यमांना राहुल गांधी व इतरांची लोणची, मसाले बरी वाटू लागली आहेत.

संतोष गंगवारसारखे मंत्री जे बोलतात तो पक्षाचा आतला आवाजच असतो. हा आतला आवाज अधूनमधून बाहेर पडत आहे इतकेच. नक्षलवाद्यांना हादरा गडचिरोली जिल्ह्य़ात पोलिसांनी रविवारी जी धडक कारवाई केली ती नक्षलवाद्यांना मोठा हादराच म्हणावा लागेल. तब्बल १६ नक्षलवादी या पोलिसी कारवाईत मारले गेले. एकाच ‘ऑपरेशन’मध्ये एवढ्य़ा मोठ्य़ा संख्येने नक्षल्यांचा खात्मा होणे हे चार दशकांत प्रथमच घडले. गडचिरोली पोलिसांच्या ‘सी-६०’ पथकाने हे घडवून दाखवले. या कारवाईचे दुसरे वैशिष्ट्य़ म्हणजे नक्षलींना चारही बाजूंनी वेढण्यात आले आणि त्यांच्यावर तुफानी हल्ला केला गेला. पोलीस किंवा नक्षलविरोधी अभियान दलाच्या पथकांना अशा प्रकारे ‘ट्रप’ करून मोठा हल्ला करणे, मोठ्य़ा संख्येने त्यांची जीवितहानी घडवून आणणे ही नक्षल्यांची रणनीती असते.

अनेकदा दुर्दैवाने त्यांनी ती यशस्वीही केली आहे. रविवारी मात्र उलट घडले आणि नक्षलवाद्यांची ही नेहमीची ‘मोडस ऑपरेण्डी’ चालली नाही. किंबहुना ते स्वतःच चारही बाजूंनी ‘ट्रप’ केले गेले आणि साईनाथ, सिनू ऊर्फ श्रीकांत यांच्यासारख्या जहाल कमांडरसह १६ नक्षली ठार झाले. या यशाने पोलीस आणि नक्षलविरोधी दलाचे मनोधैर्य निश्चितच वाढणार आहे. त्यांचे हे यश कौतुकास्पदच आहे, पण एवढ्य़ा मोठ्य़ा प्रमाणावर झालेला ‘नरसंहार’ नक्षल्यांना हताश वगैरे करील अशी शक्यता कमीच. किंबहुना अशा पोलिसी कारवायांनंतर ते भयंकर बदला घेण्याचा प्रयत्न करतात असा आधीचा अनुभव आहे. त्यामुळे भामरागडच्या जंगलातील कारवाईत पोलिसांनी नक्षलवाद्यांना मोठा धक्का दिला असला तरी नक्षलविरोधी पथकातील सुरक्षा जवानांना यापुढे प्रचंड खबरदारी घ्यावी लागेल.Loading…


Loading…

Loading...