सून ले बेटा पाकिस्तान ,बाप है तेरा हिंदुस्तान;शिवसेनेने जाळले पाकिस्तानी झेंडे

जाधव कुटुंबियांना पाकिस्तानने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा पुण्यात पाकिस्तानचे झेंडे जाळून शिवसेनेकडून पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला.

पुणे – कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी पाकिस्तानमधे त्यांना भेटायला गेल्यावर त्यांची वाईट पध्दतीने झडती घेण्यात आली. पत्नी च्या कपाळावरील कुंकू, गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या उतरवायला लावल्या. केसात कंगवा फिरवून केस तपासले, बूट काढायला लाउन पत्नीचे बूट शेवटपर्यंत परत केलेच नाहीत. कपडे बदलायला लावले. भेटीसमयी मराठीत बोलू दिले नाही अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक जाधव कुटुंबियांना देण्यात आली याचा निषेध म्हणून पुण्यात मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पाकिस्तान चा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला.

जाधव कुटुंबियाचा पाकिस्तानने जो छळ केला, याचा निषेध करण्यासाठी शिवसेना पुणेशहराचे वतीने सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांच्या नेतृत्वखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. सून ले बेटा पाकिस्तान ,बाप है तेरा हिंदुस्तान ,एक वडा दोन पाव ,पाकिस्तान भाड्खाव अशा घोषणांनी मंडई परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला.

You might also like
Comments
Loading...