fbpx

शेतकऱ्याच्या मुलीचा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकेल

udhav thakare

ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे तेव्हा काही लोकांना वाटत होते त्यांनी या ईश्वरी वरदानाचे स्वागत केले होते. त्याचप्रमाणे देशात आणि महाराष्ट्रात मोदी व फडणवीसांचे राज्य हेसुद्धा अनेकांना ईश्वरी वरदानच वाटत होते. प्रत्यक्षात आज महाराष्ट्राची स्थिती भयंकर असून सर्वत्र भूक व गरिबीचे अराजक निर्माण झाल्याची टीका शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

जगणे कठीण झाले म्हणून सामान्य लोक सहकुटुंब आपली जीवनयात्रा संपविताना दिसत. पंढरपूरजवळील ईश्वर वठार या गावातील अलिशा लवटे या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. आपल्या शिक्षणामुळे वडिलांचे आर्थिक ओझे वाढत आहे, पण उत्पन्न वाढत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण चालवायचे की चूल पेटवायची? हा प्रश्न अलिशाचे वडील हणमंत लवटे यांना पडला. वडिलांची ही ओढाताण अलिशाला सहन झाली नाही. तिने सरळ आत्महत्या केली. एका शेतकऱ्याच्या मुलीचा हा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नसल्याची घणाघाती टीका सामनामधून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रासारख्या राज्यात कुटुंबेच्या कुटुंबे रोज आत्महत्या करीत आहेत. विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे. फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात ती पडू लागली आहे. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे त्यासाठी अभिनंदन! पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी, गरीब, मजूर, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. त्यांचा आक्रोश आणि किंकाळय़ा नागपुरात दडपू नका असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.