एका रात्रीत मतदानाची टक्केवारी वाढण्याचा चमत्कार कसा झाला ? : शिवसेना

uddhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा- पालघरमधील मतदानादिवशी झालेला गोंधळ आणि त्यावरून शिवसेना भाजपमध्ये सुरु असणारे आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पालघरमध्ये 12 तासात 82 हजार मतं वाढली कशी, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने आता निवडणूक अधिकाऱ्यांनाच आता खिंडीत पकडलं आहे. एका रात्रीत हा मतदानाच्या टक्केवारी वाढण्याचा चमत्कार कसा झाला असं देखील शिवसेनेनं विचारलं आहे तसेच पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’त त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हणणं आहे शिवसेनेचं ?

पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर एकूण 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं.मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अचानक पत्रक काढून हे मतदान 53.22 टक्क्यांवर गेल्याचं सांगण्यात आलं. मतदानाच्या आकडेवारीत फार फार तर 1 ते 2 टक्क्यांचा फरक पडू शकतो. मात्र ही सहा टक्के मतं एका रात्रीत कुठून वाढली? असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर शिवसेनेनं संशय व्यक्त केला आहे.

सोमवारच्या प्रेसनोटमध्ये 8 लाख 4 हजार 950 मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते, तर मंगळवारी जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये 8 लाख 87 हजार 687 मतदारांनी मतदान केल्याचे प्रसिद्ध केले. याचाच अर्थ एका रात्रीत तब्बल 82 हजार 737 इतके मतदान वाढले.Loading…


Loading…

Loading...