fbpx

नाक खुपसून चोंबडेपणा करू नका ; उद्धव ठाकरेंचा थेट डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसून चोंबडेपणा करायची गरज नाही, अशी टीका शिवसेनेने केली. शिवसेनेच्या मुखपत्र असेलेल्या सामना मधून ही टीका करण्यात आली आहे.

हिंदू संघटनांनी मुस्लिमांवर हल्ले केले असा साक्षात्कार करणारा अहवाल अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सादर केला, इतकेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मुस्लिमांना दुजाभावाची वागणूक देत असल्याचा आरोपही त्या अहवालामध्ये करण्यात आला. दरम्यान शिवसेनेने यावर प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये नाक खुपसून चोंबडेपणा करायची गरज नाही, अशी टीका शिवसेनेने केला.

इतकेच नव्हे तर भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसणे हा तर अमेरिकेच्या सरकारचा जुना खेळ आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली आहे.