श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

श्रीपाद छिंदम

टीम महाराष्ट्र देशा- छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. नगरच्या महापौरांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. श्रीपाद छिंदम यांचा उपमहापौर पदाचा राजीनामा महापौर सुरेखा कदम यांनी मंजूर केला आहे. तर, श्रीपाद छिंदम यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा आयुक्तांकडून मंजूर करण्यासाठी शिवसेनेसह अन्य पदाधिकाऱ्यांची आयुक्तांच्या दालनात चर्चा सुरू झाली आहे

दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, उपमहापौर श्रीपाद छिंदम याने केलेला अपमान हा हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून या वक्तव्यामुळे संपूर्ण देशात नगर जिल्ह्याची बदनामी होत आहे. त्यामुळे श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक त्वरीत रद्द करावं अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. हा विषय तातडीने महासभेपुढे घेण्यात यावा असंही या नगरसेवकांचं म्हणणं आहे. यात, सभागृह नेता उमेश खंडेराव कवडे, स्थायी समितीतचे सभापती सचिन जाधव यांच्यासह आठ नगरसेवकांचा समावशे आहे.

Loading...

काय आहे प्रकरण?

श्रीपाद छिंदम हाअहमदनगर महापालिकेचे निलंबित उपमहापौर आहे. छिंदमने त्याच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील