गटाराच्या कामात लाच मागितल्या प्रकरणी शिवसेना नगरसेवक अँटीकरप्शनच्या जाळ्यात

टीम महाराष्ट्र देशा : गटाराच्या कामात ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली शिवसेना नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे गोरख जाधव असे शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे.

Loading...

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या केडीएमसीच्या आटाळी, प्रभाग ७ मधील शिवसेना नगरसेवक गोरख जाधव यांच्यावर गटाराच्या कामात ठेकेदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगरसेवक गोरख जाधव यांन ताब्यात घेतले आहे. इतकेच नव्हे तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नगरसेवक गोरख जाधव यांच्या घराती झाडाझडती सुरु आहे.Loading…


Loading…

Loading...