राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंचं आता वाराणसीत शक्तीप्रदर्शन !

टीम महाराष्ट्र देशा : राम मंदिराचा मुद्दा घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच अयोध्येत जाऊन आले. हाच मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे आता वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे वाराणसीतील काशी येथे जाऊन शक्तीप्रदर्शन करणार आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका स्वीकारली आहे.

राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही हिंदुत्ववादी संघटनांसह गेल्या 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत सभा घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते.

उद्धव यांनी अयोध्येत रॅलीचेदेखील आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा देऊन भारतीय जनता पक्षाचा गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. या मतदार संघात जाऊन उद्धव ठाकरे शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

Loading...