विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातलं शिवसेनेचं शहरप्रमुखपद रद्द

uddhav thackeray

पुणे : पुणे शहर शिवसेनेची कामगिरी मागील काही दिवसांपासून म्हणावी तशी उल्लेखनीय नसल्याचं वारंवार समोर येत आहे. यामुळेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातलं शिवसेनेचं शहरप्रमुखपद रद्द करण्यात आलं आहे. याआधी शहरात दोन शहरप्रमुख होते मात्र यापुढे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आठ वेगवेगळे प्रमुख असतील.

माजी आमदार महादेव बाबर यांच्यावर पूर्व भागाची तर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यावर उर्वरित पुण्याची जबाबदारी होती. या दोघांच्या पदांना स्थगिती देऊन शहरात विधानसभानिहाय प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेतेपदी पृथ्वीराज सुतार यांना संधी देण्यात आली आहे. विद्यमान गटनेते संजय भोसले यांना वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचा प्रमुख बनवण्यात आलं आहे.