अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचा उमेदवाराची हटके स्टाईल

अलहाबाद: अलहाबादमध्ये राजेश्वर कुमार शुक्ल हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी श्रीरामाचं वेशात आले होते. राजेश्वर कुमार शुक्ल हे अलाहाबादमधील करछना मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आहेत.

राजेश्वर यांनी श्रीरामाचं वेशांतर करुन हातात धनुष्यबाण घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखलं, मात्र राजेश्वर यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

गोंधळादरम्यान अर्ज भरण्याची मुदत संपून गेली आणि भगवान श्रीरामाच्या वेशात आलेल्या राजेश्वर कुमार शुक्ल यांना अर्जही भरता आलं नाही.

अर्ज भरण्यासाठी गेलेल्या राजेश्वर यांना पाहण्यासाठीही मोठी गर्दी जमली होती.