fbpx

‘घुमा’साठी शिवसेना मैदानात; मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक

ghuma song vanva petla

मल्टिप्लेक्स थिएटर्सकडून कायम मराठी चित्रपटाबद्दल दुजाभाव केला जात असल्याच दिसून येत आहे. याचा फटका अनेक मराठी चित्रपटांना बसला आहे. याचा सामना ‘घुमा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनादेखील याच समस्येला सामोरे जाव लागत आहे. त्यामुळे या चित्रपटाला मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये जागा मिळवून देण्यासाठी आता शिवसेना सरसावली आहे. यासंदर्भात शिवसेना भवन येथे मल्टिप्लेक्स चालक, वितरक आणि निर्माते यांची बैठक घेण्यात आली.

मल्टिप्लेक्समध्ये पुरेसे शो मिळत नसल्यामुळे घुमा सिनेमाच्या निर्मात्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी आपण पूर्णपणे तुमच्या पाठीशी आहे असल्याच आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार आज चित्रपट सेनेच्या वतीने आयोजित बैठकीला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, चित्रपट सेनेचे कार्याध्यक्ष सुशांत शेलार यांच्यासह मुव्ही टाइमचे सुनील घोलप, पीव्हीआरच्या निमिषा, वितरक समीर दीक्षित, आणि निर्माते मदन आढाव उपस्थित होते. ‘घुमा’ सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये अधिकाधिक शो उपलब्ध करून द्या, अशा सूचना यावेळी संजय राऊत यांनी मल्टिप्लेक्स चालकांना केल्या आहेत.