नाराज शिवसेनेची ‘मातोश्री’वर महत्वपूर्ण बैठक

udhav thakrey

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डावलेले गेल्याने नाराज शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. शिवसेनेकडून ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक घेण्यात येत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हि बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्हा संपर्क प्रमुख आणि संपर्क नेत्यांना बोलावण्यात आले आहे.

मोदी सरकारसाठी महत्वाचा समजला जाणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. विस्तारात शिवसेना तसेच एनडीएमधील मित्र पक्षांना स्थान दिल जाणार असल्याच बोलल जात होत. मात्र विस्तारात एनडीएच्या घटक पक्षांना विचारात घेतले गेल नाही.

शिवसेनेकडून या बाबत उघड नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. आज ‘सामना’तूनही शिवेसेनेची नाराजी लपून राहिलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर स्वत: उद्धव ठाकरेंनी बोलावलेली बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.