औरंगाबाद जिल्हा परिषदेतील शिवसेना – कॉंग्रेस युती संपुष्टात ! जालना ,अहमदनगर संभ्रमात

टीम महाराष्ट्र देशा –  शिवसेनेने भाजपा सोबत युती केल्यानंतर सगळीच सूत्र हालताना दिसत आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. महापौर बंगल्यावर झालेल्या शिवसेना-भाजपाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली.शिवसेनेने जिल्हा परिषदमध्ये असलेले काँग्रेसची युती तोडावी, तेव्हाच आम्ही प्रचाराला सुरुवात करु असा भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह होता की. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या समन्वयाची एक बैठक महापौर बंगल्यावर बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही युती तोडल्याची घोषणा केली.

शिवसेना – कॉंग्रेसच्या औरंगाबाद प्रमाणेच तशीच युती जालन्यात देखील आहे. त्यामुळे जालन्यातील काँग्रेससोबतची युतीही शिवसेना तोडणार का? याशिवाय भाजपाने देखील अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. ती देखील तोडणार का? हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या 62 असून शिवसेनेचे – 18, भाजप – 23 काँग्रेस – 16, एनसीपी – 3, तर इतर – 2 वर आहे.

सध्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष , तर काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. अडीच वर्षानंतरच्या निवडणुकीला तीन महिने राहिले आहेत. या तीन महिन्यानंतरच्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष असेल अशी घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.