युतीचे उमेदवार २०० जागांवर विजयी होतील; चंद्रकांत पाटलांना आत्मविश्वास

chandrakant_patil_

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने ४२ जागा जिंकलेल्या आहेतच. उरलेल्या सहा जागांच्या वाटपाचा प्रश्न एका चहाच्या चर्चेत संपेल आणि या सहा जागाही आम्ही जिंकू. तसेच विधानसभेलाही आमच्या दोघांच्या मिळून १८५ जागा आहेत. एकत्र आलो तर आणखीन १५ ते २० जागा सहज मिळवू,असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

लाचारी माझ्या रक्तात नाही : उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेसह ठाणे, मीरा-भाईंदर,कोल्हापूर आदी निवडणुकांच्या आकडेवारीत भाजप आणि शिवसेना आघाडीवर असल्याचे दिसून आले असून गेल्या चार वर्षांत झालेल्या निवडणुकांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर हेच दिसून येते. जर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढले तर समोर कोणी उरणारच नाही. यासाठी आता शिवसेनेने विचार करण्याची गरज असून आहे. काँग्रेसला मदत होईल असे न वागता राज्यातल्या जनतेच्या हिताचा विचार शिवसेनेने करावा. काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट योग्य होती, असे शिवसेनेला वाटते का? असा प्रश्नही या वेळी त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री हा आमदारांच्या संख्येवर ठरत असतो. शिवसेनेने आधी युती तर करावी. त्यानंतर ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार शिवसेनेचे आमदार अधिक असतील तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं