सत्ताप्राप्तीसाठी शिवसेनेला सोबत घ्या,फडणवीसांची पक्षश्रेष्ठींना कळकळीची विनंती

टीम महाराष्ट्र देशा- लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्यावे, अशी आग्री भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील बैठकीत मांडली. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना दोघांनी सोबत लढायला हवे, असे मत मुख्यमंत्र्यांनी भाजप संघटन सरचिटणीस रामलाल यांच्यासमोर मांडले. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु होण्याची शक्यता आहे.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यात त्यांनी युतीबाबत भाष्य केले होते . युती तुटल्याचे परिणाम दोन्ही पक्षांवर होतील.काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि भाजपा – शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर मतांचे विभाजन होईल. याचा फायदा आघाडीला होईल आणि शेवटी भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांना याचा फटका बसेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती .