लोकसभा पोटनिवडणुकीपूर्वी भंडाऱ्यात भाजपचा शिवसेनेला जबर धक्का !

udhav Thackeray devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानपरिषद निवडणुका आणि पोटनिवडणुकांत भाजप आणि शिवसेनेचे कुरघोडीचे राजकारण चांगलच तापल आहे. सुरवातीला शिवसेनेने पालघर येथे मुलाचे भाजपचे असलेले वनगा कुटुंब आपल्या चमूत घेतले तर याचाच बदला म्हणून भाजपने भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीपूर्वी भंडाऱ्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांना गळाला लावत शिवसेनेला जबर धक्का दिला आहे. राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

नागपुरात राजेंद्र पटले यांनी भाजपात प्रवेश करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी राजेंद्र पटले यांना उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी नाराज होत भाजपात प्रवेश केला.

राजेंद्र पटले हे शिवसेनेचे भंडाऱ्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. त्याअगोदर ते किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक आंदोलनं केली. शिवसेनेत येण्याअगोदर पटले भाजपातच होते. मात्र 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली.