आमच्यात कितीही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ – सुधीर मुनगंटीवार

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना – भाजप एकत्रच लढणार आहे. असा थेट दवाच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला आहे.

उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना हाणला

तर , आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी १९९९ मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.