fbpx

शिवसेनेला खुश करण्यासाठी भाजप थेट दानवेंना बळीचा बकरा बनवणार ?

टीम महाराष्ट्र देशा: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे, मात्र शिवसेना – भाजप युतीची बोलणी रेंगाळताना दिसत आहेत. पालघर लोकसभेच्या जागेवरून शिवसेना माघार घेण्यास तयार होत नसल्याने सेनेला खुश करण्यासाठी भाजपकडून इतर पर्याय चाचपले जात आहेत. यामध्ये थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेना सोडता येईल का ? याचा विचार भाजपकडून केला जात असल्याची कुजबुज सुरु आहे.

शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याने पाहिले आहे. युती झाली तरी आपण दानवे यांना लढत देणार असल्याची भीष्म गर्जना खोतकर यांनी केली आहे. त्यामुळे शिवसेनेला खुश करण्यासाठी थेट दानवेंना बळीचा बकरा बनवण्याचा विचार भाजप नेते करत असल्याचं बोलल जात आहे.

दरम्यान जालना मतदारसंघासह एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे विजयी झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघ देखील सेनेला दिला जाऊ शकतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 26 तर शिवसेनेने 22 जागा लढविल्या होत्या. शिवसेनेच्या मागणीनुसार आणखी एखादी जागा देण्यास भाजप तयार आहे. यामध्ये जालना आणि रावेर मतदारसंघ असू शकतात.

1 Comment

Click here to post a comment