भाजपच्या पराभवामुळे शिवसेनेचा आनंद गगनात मावेना, भाजपला दिला आत्मपरीक्षणाचा सल्ला

shivsena vs bjp

टीम महाराष्ट्र देशा- पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील मतमोजणी मंगळवारी झाली असून या निवडणुकांमध्ये भाजपाला हादरा बसला आहे. भाजपच्या पराभवाने शिवसेनेला भलताच आनंद झाल्याचं पहायला मिळत आहे. पाच राज्यातले विधानसभाचे निकाल हा काँग्रेसचा विजय नसून लोकांचा राग आहे. भाजपने या निकालांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावलाय.

दिल्लीत मंगळवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून संसदेबाहेर संजय राऊत यांनी निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘निकालातून स्पष्ट संदेश मिळतोय’, असे त्यांनी सांगितले. यावर पत्रकारांनी त्यांना ‘कोणासाठी संदेश?’ असा प्रश्न विचारला. यावर संजय राऊत म्हणाले, समझदार को इशारा काफी है. आत्मचिंतनाची गरज आहे. मोदी सरकारला उद्देशून त्यांनी हे विधान केले.

ही जादूची झप्पी नाही तर मोदींसाठी मोठा धक्का आहे – संजय राऊत 

लोकसभेची सेमीफायनल- मध्य प्रदेशात मायावतीच किंगमेकर

भाजपा समाजात फूट पाडत असल्याचा भाजप खासदाराचाच आरोप, खासदार पदाचा राजीनामा

खा. संजय राऊतांना मानाचे पान, शिवसेनेच्या संसदीय प्रमुखपदी नियुक्ती