दसरा मेळाव्यावरून परतणाऱ्या शिवसैनिकांनी घेतली कृष्णकुंज वर ‘राज’भेट

मुंबई : राज ठाकरे आणि शिवसैनिकांच्या नात्याची चर्चा नेहमीच होत असते. याचीच प्रचीती काल पुन्हा आली.
त्याच झाल अस की,शिवसेनेचा दसरा मेळावा संपल्यावर शिवतीर्थाहून परत जात असताना, मैदानाला लागुनच असलेल्या कृष्णकुंज च्या तळमजल्यातील वाचनालयात, राज ठाकरे वाचन करताना शिवसैनिकांना दिसले, त्यानंतर राज यांना पाहण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली.

पण राज ठाकरे या शिवसेनेच्या शिलेदारांना भेटणार का ? हा प्रश्नच होता. बाहेर ओरडा चालू होता ‘राजसाहेब बाहेर या , आम्हाला तुम्हाला भेटायचंय’ एरवी अगदी सहज बाहेर न येणारे राज ठाकरे यावेळी मात्र शिवासैनिकांच्या हाकेला साद देत बाहेर आले आणि मोकळ्या मनाने आपल्या जुन्या सहकार्यांना भेटले. काहींशी त्यांनी हस्तांदोलनही केलं.

Loading...

यावरून आजही शिवसैनिकांच्या मनात राज ठाकरे यांच्या बद्दल आदर असल्याच स्पष्ट होत आहे. अचानक घडलेल्या या सर्व घटनेमुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि शिवसेना यांच्या नात्याबद्दलच्या उघड चर्चा सुरू झाल्या आहेत.