कर्नाटकनंतर आणखी एका राज्यात भाजप भूकंप करण्याच्या तयारीत ?

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार अंतिम घटका मोजत असताना भाजप आणखी एक राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

गुरूग्राम येथे बोलत असताना शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. पण, आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं विधान केलं आहे. असं असलं तरीही चौहान यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण आलं आहे.Loading…


Loading…

Loading...