शिवनेरीवर शिवभक्तांचा मंत्र्यांना गराडा; सरकार विरोधात घोषणाबाजी

शिवनेरी गडावर आज शिवजन्मोत्सव साजरा केला जात आहे. परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पाळणा जोजवण्याचा तसेच भाषणाचा कार्यक्रम केला जातो. मात्र याच दरम्यान आज आक्रमक झालेल्या शिवप्रेमींमुळे मंत्र्यांना गडावरून काढता पाय घ्यावा लागला आहे.

शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शिवनेरी गडावर उपस्थित होते. दरवर्षी पाळणा जोजवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण होते. मात्र काही शिवप्रेमीं युवक आक्रमक झाल्याने भाषण न करताच मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला. तर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना सर्वांच्या रोषाला समोर जाव लागल आहे.

दरवर्षी गडावर शासकीय कार्यक्रम पार पडेपर्यंत फक्त vip पासद्वारे सोडल जात. मात्र गडावर शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो शिवभक्तांना थांबव लागल्याने हा रोष व्यक्त करण्यात आल्याच कळतंय