कर्जमाफी फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी,शिवप्रताप संघटनेची मागणी

pikkarj

करमाळा (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जो फॉर्म भरून द्यायचा आहे त्यावरून सध्या तालुक्यातील शेतकरी गोंधळात आहे.कधी सर्व्हर डाऊन झाल्याने तर कधी वेगवेगळ्या निकषांमुळे फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे कर्जमाफीसाठी फॉर्म भरण्याची मुदत वाढवुन द्यावी आशी मागणी शिवप्रताप युवा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष शंभुराजे फरतडे यांनी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

या निवेदनात त्यानी म्हटले आहे की, राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. मात्र आज शेतकऱ्यांची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी झाली आहे. कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेबर ही अंतिम मुदत असल्याने शेतकऱ्यांना पहाटे पाच वाजताच केंद्रांबाहेर रांगा लावल्या आहेत . त्यातच सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने तासभरात जेमतेम पाच-सहा अर्ज भरून होत आहेत. त्यामुळे मुदतीत अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची  ससेहोलपट होत आहे.

सध्या तालुकाभरातून शेतकरी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शहरात येत आहेत. अनेक शेतकरी पहाटे पाचपासूनच सेतू कार्यालयासमोर रांगा लावत आहेत.अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा आहे. तो टाकल्यावर त्याचा अंगठा मशिनवर लावल्यास त्याची सर्व माहिती अर्जावर जाते. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदांची आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. त्यामुळे तासनतास आधारचे लॉगईनच होत नाही. त्यामुळे एका शेतकऱ्यांचा  अर्ज भरण्यास एक ते दीड तास लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार सेतू केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत.

सेतु मध्ये गर्दी आसल्याने कर्जदार शेतकरी खासगी नेट कॅफे चा आधार घेत आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी ३००ते ४०० रु मोजावे लागत आहेत .पंरतु वेळेत फॉर्म भरला जात आसल्याने शेतकरी खाजगी नेटकॅफेवाल्यांना अतिरिक्त पैसे देत आहे राज्य सरकारने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याची गरज होती. मात्र ती नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात कोणत्याच कंपन्यांची इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नाही. त्यात सर्व्हरवर राज्यभरातील शेतकरी अर्ज भरत असल्याने तेवढ्या लाईट उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.फॉर्म भरण्यापासुन वंचित राहीलोे तर ,कर्ज माफी पासुन वंचित राहवे लागेल या दडपणाखाली शेतकरी दिसुन येत आहेत.यातून एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तर त्याला कोण जबाबदार असा सवाल देखील फरतडे यांनी केला आहे