Share

Shivpratap Garudjhep Premium | शरद पवार यांनी केले अमोल कोल्हेंचे कौतुक! म्हणाले…

मुंबई :मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहे. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे हे मुख्य भूमिकेत दिसले आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य सत्तेचा पहारा तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याच्या सुटकेच्या प्रसंगाचे वर्णन करत हा ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम यांनी केले असून हा चित्रपट जगदंब क्रिएशन द्वारे प्रस्तुत केला गेला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रिमिअम सोहळा पार पडला आहे. या प्रीमियम मध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांमध्ये मा. श्री. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. चित्रपटाचे प्रीमियर संपताच शरद पवारांनी अमोल कोल्ह्यांचे भरभरून कौतुक सोशल मीडिया पोस्टद्वारे केले आहे.

शरद पवार यांची पोस्ट

खासदार अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या आगामी चित्रपटाचे प्रीमियर सादरीकरण काल पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे, कौशल्याचे आणि तल्लख बुद्धीमत्तेचे यथायोग्य वर्णन चित्रमाध्यमात करण्यात आले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह चित्रपटातील सर्व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट भूमिका केली आहे. सर्व कलावंतांचे परिश्रमपूर्वक सकस चित्रपट निर्मितीसाठी अभिनंदन व यशस्वीतेसाठी शुभेच्छा!

 शिवप्रताप गरुडझेप मधील इतर कलाकार 

या चित्रपटांमध्ये खासदार डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर बाल कलाकार हरक अमोल हे शंभूराजे यांची भूमिका पार पाडणार आहे. अभिनेत्री मनवा नाईक सोयराबाई यांची भूमिका साकारणार असून अजय तपकिरे बहिर्जी नाईक यांची भूमिका पार पाडणार आहे.

चित्रपट कधी रिलीज होईल?

आग्र्याच्या मोहिमेचा हा रोमांचक थरार 5 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

मुंबई :मराठी चित्रपट सृष्टी मध्ये अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित होत आहे. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now