शिवनेरी गडाच्या विकासासाठी 23 कोटी रुपयांचा निधी देणार – अजित पवार

पुणे : जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतं आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गड दुमदुमुन गेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना वंदन केले. स्वराज्याची राजधानी राहिलेल्या शिवनेरी गडावर शिवजयंतीचा सोहळा मोठ्या थाटात पार पडतो. राज्यभरातून लाखो शिवभक्त शिवनेरीवर दाखल होत शिवरायांना अभिवादन करतात.

Loading...

यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘शिवनेरी गडाच्या विकासासाठी 23 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘रयतेच खऱ्या अर्थाने राज्य आलं आहे. असा एक विश्वास जनतेला वाटतोय,’ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पुढे अजित पवार म्हणाले,  ‘इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामांची माहिती दिली. तातडीचे 23 कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने 23 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले.’

‘शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील”, असं अजित पवारांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका