बिग बॉसच्या घरात जाण्यावरून शिवलीला पाटील यांनी मागितली माफी, म्हणाल्या…

shivlila patil

मुंबई: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यातच या शो मधील स्पर्धक प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या सहभागामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. परंतु काही दिवसानंतर प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र नुकतेच शिवलीला यांनी बिग बॉसच्या सहभाग घेतल्यामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

प्रसिध्द वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवलीला म्हणाल्या की, ‘मी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने माझा सर्व वारकरी संप्रदाय आणि माझे सर्व ज्येष्ठ लोक माझ्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे मी या सर्वांची दोन्ही हात जोडून आणि मस्तक टेकून माफी मागते. मी माझे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग चुकीचा निवडला असला तरी माझा उद्देश अतिशय प्रामाणिक आणि चांगला होता, असे म्हणत तिने सर्वांची माफी मागितली.

शिवलीला पाटील या मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या कन्या आहेत. तिने फारच कमी वयात कीर्तनाला सुरुवात केली होती. त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हेही एक कीर्तनकार होते. त्यामुळे हा वारसा त्यांना जन्मजात मिळाला आहे. बिग बॉसच्या एन्ट्रीने सोशल मिडीयावर शिवलीला यांना ट्रोल करण्यात आले होते. अनेकांनी सोशल मिडियावर कमेंट करत नाराजी व्यक्त केली होती. यावेळी  या शोमध्ये त्यांचं वागणं त्यांच्या कीर्तनापेक्षा पूर्णपणे वेगळं जाणवलं होतं आणि अखेर त्यांनी तब्येत बिघडल्यामुळे शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या