शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा

शिवमय वातावरणात पार पडला शिवजन्मोत्सव सोहळा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. शिवजयंतीनिमित्त किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

आज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यात उत्साहात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जनस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार शरद सोनावणे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा पोलिस प्रमुख सुवेज हक उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस हे गडावर पोहोचताच त्यांनी शिवजन्मस्थळी भेट दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी घेऊन शिवछत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रशासनाच्यावतीने शिवनेरी गडावर मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी गडावर साहसी खेळांची प्रात्याक्षीके पार पडली.

cm on shvaneri