श्रावण महिन्यात खास आपल्यासाठी शिवजल मंदिर आणि त्याचे वैशिष्ट्य

श्रद्धा ….. निश्चय …… चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात हे अनेक मान्यवरांनी सिद्ध करून दाखवलाय. असेच काहीसे सिद्ध करून दाखवलंय ते फलटण मधील व्ही एन एस ग्रुपच्या टीमने. देशाच्या पंतप्रधानांनी परवडणाऱ्या किमतीत घरे बनवण्याचा संकल्प केलाय आणि त्यालाच अनुसरून कोणत्याही आणि कोणाच्याही (सरकारी / निमसरकारी) मदतीशिवाय व्ही एन एस ग्रुपने शिवजल सृष्टी हा प्रोजेक्ट सादर केलाय. अवघ्या 2,61,000/- रुपयात ना भूतो ना भविष्यती असा 1 रूम किचेन चा बंगलोचा प्रोजेक्ट त्यांनी साकार केलाय आणि लवकरच ह्या प्रोजेक्टचे लोकार्पण होणार आहे.

याच परिसरात एक जागृत देवस्थान म्हणजेच भगवान शंकराचे मंदिर वसले आहे. किंबहुना ह्या जागृत अशा भगवान शिवाच्या स्थानामुळेच हा देखणा प्रोजेक्ट तयार झालाय. हा प्रोजेक्ट जेव्हा तयार होत होता तेव्हा व्ही एन एस ग्रुपला अनंत अडचणींचा सामना करावा लागला. मध्यंतरी आपल्या देशात नोटबंदी , रेरा , जी एस टी आणि जागतिक मंदी मुळे बांधकाम क्षेत्रावर एक अभूतपूर्व नैराश्य आलं होत पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून व्ही एन एस च्या टीम ने जणू शिवजल सृष्टी उभी करण्याचा ध्यासच घेतला होता. पण असे म्हणतात कि या ठिकाणी असलेल्या भगवान शिवाच्या वास्तव्यामुळेच हि शिवजल सृष्टी उभी राहिली. वातावरणातला पॉजिटीव्ह फरक हा तिथे गेल्याशिवाय अनुभवता येणंच शक्य नाही. सुंदर मंदिर आणि मन मोहवून टाकणारे शिवलिंग मनाला प्रसन्न करून जाते. आणि त्यातच एक अद्भुत असा निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. या शिवलिंगाच्या डोक्याकडील भागातून पाण्याचा शीतल असा एक प्रवाह अनुभवायला मिळतो जणू काही शंकराने आपला तिसरा डोळा उघडून तो पाण्याच्या रूपातून आपल्या भक्तांना प्रसाद आणि आशीर्वादच देतोय. ह्या पाण्याचे वैशिष्टयही असे आहे हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे. यासंबंधीच्या जेवढ्या म्हणून टेस्ट आहेत त्या सर्व टेस्ट करून झाल्या आहेत. या सर्व टेस्टच्या माध्यमातून हे सिद्ध झाले कि हे नॅचरल अल्कलाइन वॉटर आहे. ह्याचे रिपोर्ट सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. जे पाणी आजच्या घडीला 600 ते 700 रुपये लिटर अशा भावात अनेक मान्यवर विकत घेतात आणि तेही परदेशातून आणले जाते. तेच पाणी ह्या शिवजल सृष्टी मध्ये आपण प्रसाद रूपाने पिऊ शकतो. या पाण्याचे वैशिष्टही असे कि , उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कि दुष्काळ असो पाण्याचा अखंड स्रोत रोज किमान 600 लिटर पाणी हे रोज मिळतेच. चमत्कार असा कि इथून थोडे दूर गेलो आणि पाण्याच्या स्रोतांसाठी काही प्रयत्न केले तर 400 ते 500 फूट खाली खोल जाऊन देखील पाणी लागत नाही. पण इथून मात्र रोज अव्याहतपणे पाण्याचा निखळ स्रोत वाहतोय. शारीरिक दृष्टया ह्या पाण्याचे असामान्य महत्व आहे. अनेक आजारांवर ह्या पाण्याचा खूप चांगला पॉजिटीव्ह परिणाम दिसून आलाय आणि हे अनेक डॉक्टरांनी सिद्धही करून दाखवले आहे. म्हणूनच देशातील काही वॉटर प्युरिफायर उपकरण बनवणाऱ्या कंपन्यांनी आता अल्कलाईन वॉटर मिळण्याकरता आपल्या उत्पादनांमध्ये काही बदल घडवून आणले आहेत. पण तरीही आपण म्हणतो ना नॅचरल ते नॅचरलच.

Loading...

अल्कलाईन (अल्कधर्मी) पाणी म्हणजे नेमके काय ?

वैज्ञानिक भाषेत अल्कधर्मी पाणी म्हणजेच शुद्ध पाणी असेही म्हणले जाते. म्हणजेच प्राथमिक स्तरातील पीएचचा स्तर उच्चं आहे. पीएच पातळी हा असा क्रमांक आहे जो आम्लीय किंवा अल्कधर्मीचा स्तर 0 ते 14 च्या प्रमाणात असतो. उदा. जर लेव्हल 1 असेल तर याचा अर्थ असा होतो कि पाणी फारच आम्लीय आहे आणि जर तो 13 असेल तर मग तो फारच क्षारयुक्त असतो. अल्कधर्मीयुक्त पाण्याचा नियमित पिण्याच्या पाण्याच्या तुलनेत अधिक पीएच पातळी आहे. अल्कधर्मी पाण्याचा स्तर सुमारे 8 ते 9 पीएच असतो.

अल्कलाईन (अल्कधर्मी) पाण्याच्या सेवनाने नेमके कोणते फायदे होतात ?

अल्कधर्मीयुक्त पाण्याच्या तुलनेत सामान्यतः अल्ट्रा हायड्रेटेड गुणधर्म असतात. जे लोक दिवसभर व्यस्त असतात किंवा खूप काम करतात अश्या लोकांसाठी हे पाणी अतिशय फायदेशीर आहे कारण हे पाणी शरीरास दीर्घ कालावधीसाठी हायड्रेट ठेवते. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की अल्कधर्मी पाण्यात लहान अणू असतात आणि ते सहजपणे आपल्या पेशी त्यांना शोषून घेतात ज्यामुळे आपल्या शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यास मदत करतात.

अल्कधर्मीयुक्त पाण्यामध्ये मॅग्नेशिअम , सिलिका , पोटेशियम आणि कॅल्शिअम सारखे अनेक पौष्टिक घटक असतात. हे घटक आपले संपूर्ण आरोग्य तसेच हाडांना मजबूत करतात.

अल्कधर्मीयुक्त पाण्यात अनेक अँटिऑक्सिडंट असतात ज्या शरीरातून हानिकारक घटक बाहेर काढतात.

अल्कधर्मीयुक्त पाण्याचा सर्वात महत्वाचा लाभ हा आहे कि ते पोट आणि आतड्यांमधील घाण आणि रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

अल्कधर्मीयुक्त पाणी पिणे वजन कमी करण्यास मदत करते कारण या पाण्याच्या नित्य सेवनामुळे चरबीचा संचय कमी करते.

अल्कधर्मीयुक्त पाण्याच्या नित्य सेवनामुळे कर्करोग , मधुमेह आणि गर्भधारणे दरम्यान सुद्धा खूप पॉजिटीव्ह फरक पडू शकतो.

संपर्क : शिवजल सिटी , शिखर शिंगणापूर रोड , नाईक बोमवाडी , फलटण
9657611112 / 9850795733

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...