वेणेखोलमधील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या ‘या’ सूचना

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यातील उरमोडी धरणप्रकल्पातील वेणेखोल गावातील खोतदारांचे पुर्नवसन म्हसवड माण येथे करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र अद्यापही पुनर्वसनाचा प्रश्न  मार्गी लागला नसल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने वेणेखोलमधील प्रकल्पग्रस्तांचे गावठाण मंजूर करुन त्यांना प्लॉट वाटप करावे, अशी आक्रमक भुमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतली.

त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असल्यचे दिसत आहे. ६५ टक्के कपातीच्या पावत्या असणार खातेदारांना १० दिवसांत प्लॉट वाटप करण्याच्या सुचना उपस्थित अधिकार्यांना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या १० दिवसांत प्रकल्पग्रस्तांना प्लॉट वाटप सुरु केले जाईल अशी माहिती मिळाली आहे.

अप्पर जिल्हाधिकरी शिंदे यांच्या दालनात वेणेखोल प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन व इतर प्रश्नासदर्भात बैठक झाली. बैठकीत ६५ टक्के कपातीच्या पावत्या असणाऱ्या खातेदारांना वारंवार सातबारा, फेरफार आदी कागदपत्रे काढण्यासाठी सांगून त्यांना नाहक त्रास देणे थांबवावे, तातडीने गावठाण, प्लॉट वाटप करावे. ६५ टक्के कपातीचे पैसे भरणा न केल्याने अपात्र दाखवलेल्या ३५ खातेदारांना तत्काळ पात्र करुन घ्यावे. अशा सूचना शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या.

तसेच खातेदारांना गेल्या २० वर्षांचे व्याज मिळावे आणि जुन्या संकलनाप्रमाणे खातेदारांना प्रत्येकी २ एकर जमीन देण्यात यावी, आदी मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कागदपत्रांसाठी खातेदारांना वेठीस न धरता ६५ टक्के कपातीच्या पावत्यांनुसार त्यांना तत्काळ पुनर्वसन जागी प्लॉट देण्यात यावेत आणि सर्व मागण्यांची त्वरीत पुर्तता करावी, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या :