माझ्या दाढीची काळजी तुम्ही करू नका, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला  

udyanraje vr shivendraraje

टीम महाराष्ट्र देशा- गणेश विसर्जनाचा वाद साताऱ्यात चांगलाच रंगला आहे. माझी दाढी आणि विसर्जन याचा काही संबंध आहे का? पण, विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही दाढीकडे गेलात. माझ्या दाढीची काळजी तुम्ही करू नका. मला दाढी आहे म्हणून दाढी येते. तुम्हाला उगवती का नाही, उगवली तर राहील का नाही, अशी चिंताजनक अवस्था तुमची आहे  असा प्रतिटोला आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांना लगावला आहे.

Loading...

खा. उदयनराजे यांनी दिलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देताना आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्या सातारकरांसमोर तुम्ही आणि मी दोघेही लहानाचे मोठे झालो, ज्या सातारकरांनी दोघांनाही घडवले, त्यांच्यासमोर माफी मागण्यात कमीपणा वाटण्याचे कारणच काय? आज तुम्ही तमाम सातारकरांना वेठीस धरुन विसर्जनाचा तेढ निर्माण केला. गणेशमंडळांमध्ये संभ्रम निर्माण करुन हा प्रश्न सोडवण्याऐवजी चिघळवला.

आता प्रशासनाने कृत्रीम तळे खोदले तर, माझ्यामुळेच खोदले असे निर्लज्जपणे सांगता. याबद्दल थोडीतरी शरम बाळगा आणि सातारकरांची माफी मागा. माफी मागण्यात तुम्हाला कमीपणा वाटण्याचे कारण काय, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.

शिवेंद्रराजे, दाढ्या वाढवून अकलेत वाढ होत नसते – उदयनराजे

खा.छत्रपती उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्जLoading…


Loading…

Loading...