दोन्ही राजेंमधील संघर्ष कायम, उदयनराजेंसोबतच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंचं सूचक वक्तव्य

टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यातील दोन राजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला. मात्र, त्यांना यात काही यश आलेलं दिसत नाही. गेल्या काही दिवसांत या दोन्ही राजेंमधील वैर काही प्रमाणात का होईना कमी झाल्याच्या चर्चा सुरु होत्या पण अखेर हे मनोमिलन होणार नसल्याच स्पष्ट झाल आहे.

शिवेंद्रराजे भोसले हे रविवारी बदलापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना उदयनराजेंसोबत मनोमिलन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून मला त्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल, असं सूचक वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं. ज्यांना ज्यांना त्रास झाला आहे, ज्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत आहे, अशा लोकांना मी रोखू शकत नाही. त्यांच्या भावनांचा आदर करणं हे माझं काम आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या त्यांनी उदयनराजेंसोबत मनोमिलन होऊ शकत नाही, असं सूचित केलं आहे.

Loading...

दरम्यान, साताऱ्याच्या या दोन राजांनी एकत्र यावं, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसद्धा अलिकडेच डोकं शांत ठेवा, असा सल्ला त्यांना दिला होता. त्यामुळे पवारांच्या शिष्टाईनं दोन राजांचं मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शिवेंद्रराजे यांचे काही समर्थक शरद पवार यांच्या भेटीला गेले, आणि त्यांनी उदयनराजेंबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजत आहे. त्यानंतर आता शिवेंद्रराजेंनीही आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचं सांगत मनोमिलनाची शक्यता फेटाळून लावलीय. त्यामुळे सातारच्या राजकारणातला दोन राजांमधील संघर्ष यापुढेही कायम राहणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित