शिवेंद्रसिंहराजे माझा भाऊ आहे, त्याच्या खांद्यावर हात टाकणार नाही, तर कोणाच्या टाकणार- उदयनराजे भोसले

टीम महाराष्ट्र देशा : शिवेंद्रसिंहराजे माझा भाऊ आहे. त्याच्या खांद्यावर हात टाकणार नाही, तर कोणाच्या टाकणार. असे म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला खासदार उदयनराजे भोसलेंनी आपल्या स्टाईल मध्ये उत्तर दिले आहे.कुडाळ येथील भेटीसंदर्भात ते बोलत होते.राजघराण्यातील दोन राजांचे मनोमिलन व्हावे, असे राजघराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना वाटत आहे त्या प्रश्नावर पत्रकारांनी खासदार उदयनराजे भोसलेंना बोलतं केले.

“मलाही एकत्र यावे असे वाटते. पण, वाटून काय करायचे. टाळी एका हाताने वाजत नाही. अशी खंत व्यक्त केली व भविष्यात चांगले होईल, अशी ज्याची-ज्याची इच्छा असेल तर त्याला माझा नकार नाही.” असे म्हणत टाळीसाठी खासदार उदयनराजेंनी हात पुढे केला.निवडणुका येतील-जातील. एकत्र यायचे असेल तर कायमस्वरूपी या, अन्यथा त्याला काहीही अर्थ राहणार नाही, असेही  स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज व्यक्त केले.

याअगोदरही महाराष्ट्र्रात दोन भावांच्या टाळी देण्यावरून चर्चा रंगली होती.यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सेनेचं मुखपत्र ‘सामना’मधून टाळीसाठी राज ठाकरेंकडे हात पुढे केला होता. यावर थेट राज ठाकरेंनी टोला लगावत ‘टाळी’ला स्पष्ट नकार दिला होता,त्यामुळे ते दोन बंधू एकत्र आले नाहीत.आता या राजघराण्यातील दोन बंधूचे मनोमिलन होणार का ? उदयनराजेंनी टाळीसाठी हात पुढे केला आहे,त्याला शिवेंद्रराजेंची हो असणार का ? याची उस्तुकता या राजघराण्यावर प्रेम करणाऱ्यांना लागली आहे.यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले काय भूमिका घेतात हे बघावे लागणार आहे.