मी साताऱ्याचा एकटा मालक, असे कोणी समजू नये;शिवेंद्रसिंहराजेंचा नाव न घेता उदयनराजेंना टोला

सातारा: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. हल्लाबोल यात्रेच्या साताऱ्यातील सभेत उदयन राजेंनी जाने टाळले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंनी मी साताऱ्याचा मालक आहे, असे एकट्या कोणी समजू नये, असे नाव न घेता उदयनराजेंवरच हल्ला चढवला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल यात्रा काढत संपूर्ण राज्य पिंजून काढले. मात्र साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्याच सभेत दिसले नाहीत. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बसतात, उठतात. त्यामुळे त्यांची गिनती वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. मग आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसोबत ते हल्लाबोल यात्रेत कशाला फिरतील, असा खुलासा अजित पवारांनी केला. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु असून दरम्यान, अजितदादा पत्रकारांसोबत बोलत होते.

उदयनराजे भोसले यांनी काहीदिवसांपूर्वी भाजप नेत्यांसोबत बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त होते. उदयनराजेंनी साताऱ्यातील हल्लाबोल सभेला जाने टाळले. त्यामुळे उदयनराजे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर नाराज असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. तसेच शिवेंद्रसिंहराजेंनी मी साताऱ्याचा मालक आहे, असे एकट्या कोणी समजू नये, असे नाव न घेता उदयनराजेंवरच हल्ला चढवला. त्यामुळे राजकीय समीकरणे वेगाने बदलतांना दिसत आहेत.

You might also like
Comments
Loading...