…तर मी हातात बांगड्या भरलेल्या नाहीत शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना खुला इशारा

udyanraje bhosle & shivendraraje

सातारा : आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्वाच्या वादाने साताऱ्यातील खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्षाने टोक गाठलं आहे. पोलिसांकडून शिवेंद्रराजेंना लक्ष्य केल जात असल्याने आता शिवेंद्रराजे भोसलेंनी थेट खा.उदयनराजे भोसले यांना उघड इशारा दिला आहे. ‘आपल्यावर असे हल्ले होणार असतील, तर आपण हातात बांगड्या भरलेल्या नाहीत,’ असा इशारा आ. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना दिला आहे.

दरम्यान , आनेवाडी टोलनाक्यावरील वादानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.पण उदयनराजेंच्या केवळ एकाच समर्थकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिल्याचा आरोप होत असल्याने, आ. शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंना थेट आव्हान दिलं आहे.