‘जे हाय ते हाय जे नाय ते नाय’; उदयनराजेनंतर आता शिवेंद्रराजेंचीही डायलॉगबाजी

blank

टीम महाराष्ट्र देशा – साताऱ्याच्या राजकारणात उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची नेहमीच चर्चा असते. त्यातच आज सत्र्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा आज वाढदिवस. ते आज एका व्हिडीओमुळे चांगलेच चर्चेत आहेत. शिवेंद्रराजेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्यावर रचलेले एक गाणे ऐकून दाखवले. यावर प्रतिक्रया देत शिवेंद्रराजे यांनीही त्यांच्या मिशांना ताव देत कार्यकर्त्यांना एक डायलॉग बोलून दाखवला. ‘जे हाय ते हाय जे नाय ते नाय’ शिवेंद्रराजे यांनी हा डायलॉग बोलल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

त्यातच शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाला सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी हजेरी लावली आहे. तसंच यावेळी नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळत ‘एकच डॅशिंग राजे शिवेंद्रराजे’ अशा घोषणाही दिल्या. त्यामुळे साताऱ्यातील राजकीय चर्चांनी पुन्हा वेग पकडला आहे.

दरम्यान, सोशल मिडीयावर या सर्व प्रसंगच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. शिवेन्द्रराजेंच्या डायलॉगबाजीमुळे त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांसोमर माहोलच रंगवला.