शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नामांकन जाहीर

क्रीडा मंत्री विनोद तावडेंनी केली घोषणा

मुंबई: क्रिकेटर रोहित शर्मा, अंजिक्य रहाणे, रियो ऑलिम्पिकमध्ये भारतच प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर आणि हॉकीपटू युवराज वाल्मिकी यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून येत्या १७ फेब्रुवारीला गेट ऑफ इंडिया येथे राज्यपालांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

तसेच ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेली खेळाडू कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, नाशिकचे सायकलिस्ट महाजन बंधू यांना साहसी क्रीडा प्रकारासाठी पुरस्कार, तर २०१४-१५साठी ग्रँड मास्टर विदित गुजराथी यांनाही पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. जागतिक विक्रमवीर जलतरणपटू रोहन मोरे याचाही गौरव करण्यात येणार आहे.